अकोल्यात प्राथमिक आरोग्य सेवेला नवी ऊर्जा! संयुक्त प्रशिक्षणातून आरोग्य पथक होणार अधिक सक्षम
अकोल्यात प्राथमिक आरोग्य सेवेला नवी ऊर्जा ! संयुक्त प्रशिक्षणातून आरोग्य पथक होणार अधिक सक्षम अकोला , दि. १० : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष प्रशिक्षण मोहिमेला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे . या प्रशिक्षणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आशा ( एएनएम एमपीडब्ल्यू सीएचओ आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी अशा संपूर्ण आरोग्य पथकाला प्रथमच एकत्रित प्रशिक्षण दिले जात आहे . यापूर्वी प्रत्येक घटकाचे स्वतंत्र प्रशिक्षण होत असताना आता ७ ते १० सदस्यांचे संपूर्ण पथक एकत्र प्रशिक्षण घेत असल्याने परस्पर समन्वय वाढून ग्रामीण आरोग्य सेवा अधिक प्रभावी होणार आहे . प्राथमिक आरोग्य केंद्राचे नेतृत्व आणि संपूर्ण आरोग्य पथक सक्षम झाले तर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल घडू शकतो ...