मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ओळखपत्रांचा पर्याय
मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ओळखपत्रांचा पर्याय
अकोला, दि. 30 ; विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदान ओळख पत्र नसल्यास अन्य पर्यायांचा वापर करता येणार आहे.
जे मतदार आपले मतदान ओळख पत्र दाखवू शकणार नाहीत त्यांच्यासाठी पर्यायी पुरावे म्हणून पुढील कागदपत्रांचा ओळखीचा पुरावा म्हणून वापर करता येईल. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यापैकी कोणतेही एक कागदपत्र मतदार आपल्या
ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करु शकतील,असे जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी कळविले आहे.
आधार कार्ड, मनरेगा रोजगार
पत्रक (जॉब कार्ड), बँक / टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम
मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालन परवाना, स्थायी खाते
क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले
स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र
असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र सरकार/राज्य शासन/सार्वजनिक क्षेत्र
उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र
असलेले सेवा ओळखपत्र, संसद सदस्य/विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले
अधिकृत ओळखपत्र, विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (युडीआयडी) आदी कागदपत्रांचा
पर्याय म्हणून वापर करता येईल.
ही कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार असून, मतदारांनी दि. 20 नोव्हेंबर
रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा