हक्क बजावणार मतदानाचा ‘स्वीप’अंतर्गत मतदान जागृतीचे शिक्के वितरित

 








 

हक्क बजावणार मतदानाचा

‘स्वीप’अंतर्गत मतदान जागृतीचे शिक्के वितरित

अकोला, दि. 28 : ‘स्वीप’अंतर्गत अभिनव संकल्पनेतून  ‘मी जागरूक नागरिक भारताचा, हक्क बजावणार मतदानाचा’  अशा ओळींचा ठसा उमटविणारे रबरी शिक्के व्यापारी व दुकानदारांना आज वितरित करण्यात आले.  

जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार व ‘स्वीप’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनानुसार ‘स्वीप’अंतर्गत अभिनव संकल्पनांतून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील पालिका बाजार, कापड बाजार, गांधी रस्ता, फतेह अली रस्त्यावरील विविध दुकाने आदी ठिकाणी स्वीप स्वयंसेवकांनी जाऊन दुकानांमध्ये रबरी शिक्क्यांचे वितरण केले. दुकानांच्या पावत्या, देयके आदींद्वारे हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. सर्व ग्राहकांपर्यंत संदेश पोहोचविण्याची ग्वाही सर्व व्याववसायिकांनी दिली.  यावेळी विविध स्टीकर्सही बाजारपेठांत लावण्यात आले आहेत. सीईओ बी. वैष्णवी यांच्यासह महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, उपायुक्त गीता ठाकरे आदी उपस्थित होते.

 

सर्व मतदारांनी येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन श्रीमती वैष्णवी आणि पालिका आयुक्त डॉ. लहाने यांनी केले.

 

यावेळी शहर अभियंता नीला वंजारी, सहा.आयुक्त धनश्री पवार, सहा.नोडल अधिकारी अविनाश बेलोकार, स्वीप सदस्य विनोद सपाट, श्रीकांत काळे, क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, आयुक्तर यांचे स्य्यि सहायक जितेंद्र तिवारी, कोंडवाडा विभाग प्रमुख अनिल बिडवे, स्वच्छता विभाग प्रमुख संजय खोसे, मनपा जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, शहर समन्वययक सैय्यद आफाक आदी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले