मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थींनी बँक खात्याला तत्काळ आधार सीडिंग करावे - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

लाभार्थींनी बँक खात्याला तत्काळ आधार सीडिंग करावे

-        जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

अकोला, दि. 3 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दि. 5 ऑक्टोबर रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी आपल्या बँक खात्याला तत्काळ आधार सिडिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  

योजनेच्या अर्जदाराने अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सीडेड आहे की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. बँक खात्याला आधार सिडिंग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सिडींग करून घ्यावे. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. दि. 5 ऑक्टोबरला पात्र लाभार्थींना डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यात  लाभ जमा होणार आहे. तेव्हा लाभार्थ्यांनी  आधार सिडिंग 2 दिवसात करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले