राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध २८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

 


राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध

 २८  ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

  अकोला, दि. ३ : ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मागविण्यात येत असून निर्मात्यांनी १ जानेवारी  ते ३१ डिसेंबर २०२३ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-६५ येथील जनसंपर्क विभागात कार्यालयीन वेळेत प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्याचबरोबर  www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. निर्मात्यांनी परिपूर्ण अर्ज भरून महामंडळाकडे विहित मुदतीत प्रवेशिका सादर करायच्या आहेत.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले