मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत बालसंरक्षणाबाबत मार्गदर्शन
मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत बालसंरक्षणाबाबत मार्गदर्शन
अकोला, दि. 3 :
शिक्षण व महिला व बालविकास कार्यालयातर्फे बालसंरक्षण या विषयावर बाळापूर तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयात मंगळवारी झाली. बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘चाईल्ड हेल्पलाईन’, विविध कायदे याविषयी त्यात मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्याध्यापक सुनील म्हसने कार्यशाळेच्या
अध्यक्षस्थानी होते. सक्षम टीमचे समुपदेशक गोपाळ मुकुंदे यांनी विद्यार्थी सुरक्षितता व उपाययोजना याबाबत चित्रफितीद्वारे
सुबोध भाषेत मार्गदर्शन केले. तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे विधीज्ञ ॲड. प्रवीण अंभोरे, ॲड. दीपक
बरडे यांनी पॉक्सो कायद्याबाबत माहिती दिली. चाईल्ड हेल्प लाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये
यांनी हेल्पलाईनबाबत सांगितले. जिल्हा बाल संरक्षण
कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी बाल संरक्षण यंत्रणा, महिला व बालविकास विभागांतर्गत बालकांसाठी विविध योजनांची माहिती दिली. सखी सावित्री समितीची रचना व कार्य या विषयावर एन्करेज एज्युकेशनल फौंडेशनचे महेंद्र गणोदे यांनी सादरीकरण केले. तालुक्यातील
सर्व शाळांचे मुख्याध्यापक, केंद प्रमुख, विस्तार अधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात
ही कार्यशाळा झाली. चाईल्ड हेल्पलाईनची स्टीकर्स यावेळी शाळांना
वाटण्यात आली. गटशिक्षणाधीकारी श्रीमती वैशाली रामटेके यांनी
प्रास्ताविक केले. मनोज वाडकर यांनी सूत्रसंचालन केले. विस्तार अधिकारी देवीदास पवार यांनी आभार मानले. रोहित भाकरे व वैभव भदे यांनी परिश्रम
घेतले.
००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा