प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठ्याचे रब्बीसाठी नियोजन करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठ्याचे रब्बीसाठी नियोजन करा
- जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 29 : बिगरसिंचन मागणी वजा करून उर्वरित शिल्लक राहणा-या पाणीसाठ्याचे रब्बी हंगामासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या सभेत ते बोलत होते. पाटबंधारे विभाग, जि. प., पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र, महापालिका, पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण, मूर्तिजापूर, तेल्हारा, शेगाव, पातूर येथील नगरपरिषदा आदींचे अधिकारी उपस्थित होते.
पाणी आरक्षणाच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम संबंधित यंत्रणेने जलसंपदा विभागाकडे भरणे बंधनकारक आहे. थकबाकीदार योजनांनी ती तत्काळ भरावी. काटेपूर्णा प्रकल्पाची 64 खेडी पाणीपुरवठा योजना व वान प्रकल्पाची 84 खेडी अकोट पाणीपुरवठा योजना जादा पाणी आरक्षित करत आहेत, तसेच महान मत्स्यबीज केंद्र व पातूर योजना दरवर्षी आकस्मिक पाणी आरक्षित करत असल्याचा जलसंपदा विभागाचा अहवाल आहे. या योजनांनी वाढीव बिगर सिंचन पाण्याची गरज लक्षात घेऊन रीतसर पाणीआरक्षण करून घ्यावे व ज्या ग्राहकांनी पाणी मीटर लावले नाहीत त्यांनी ते तत्काळ बसवून घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा