निवडणुकीदरम्यान जप्तीसंदर्भात त्रिसदस्यीय समिती निर्णय देणार
निवडणुकीदरम्यान जप्तीसंदर्भात त्रिसदस्यीय समिती निर्णय देणार
अकोला,दि. 25 : निवडणुकीदरम्यान रोख रक्कम जप्तीसंदर्भात त्रिसदस्यीय समितीकडून सविस्तर तपास करून निर्णय घेतला जाणार आहे.
जप्त रक्कम मुक्त करण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम’ निश्चित करण्यात आली आहे. जनतेची व ख-या व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी जप्त रक्कम मुक्त करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी तीन अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, निवडणूक खर्च संनियंत्रण अधिकारी व जिल्हा कोषागार अधिकारी एम. बी. झुंजारे यांचा या समितीत समावेश आहे.
निवडणुकीदरम्यान पोलीस, एसएसटी, एफएसटी यांनी केलेल्या जप्तीच्या प्रकरणाची समिती स्वत: तपासणी करेल व सदर जप्तीविरोधात एफआयआर दाखल नसेल किंवा ही रक्कम निवडणूक प्रचार, उमेदवार, पक्ष आदीशी संबंधित नसेल तर ही रक्कम परत देण्यासाठी पावले उचलली जातील. जर रक्कम 10 लाखांच्या वर असेल तर प्राप्तीकर विभागाला कळविण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक खर्च संनियंत्रण अधिकारी श्री. धोंगडे (मो. 8805049933) यांनी दिली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा