'वॉक फॉर डेमॉक्रसी'च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद शासकीय उद्यान व वसंत देसाई क्रीडांगणात मतदार जागृती अभियान
'वॉक फॉर डेमॉक्रसी'च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद
शासकीय उद्यान व वसंत देसाई क्रीडांगणात मतदार जागृती अभियान
अकोला, दि,३०: 'स्वीप'अंतर्गत शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान येथे, तसेच इतर उद्यानांत 'मॉर्निंग वॉक'साठी आलेल्या नागरिकांशी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 'वॉक फॉर डेमॉक्रसी' च्या माध्यमातून संवाद साधला व दि.२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असा संदेश दिला.
नोडल अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी महेश परांडेकर,मनपा उपायुक्त गीता ठाकरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार आदी उपस्थित होते.
विविध देशभक्तीपर गीतांचे आसमंतात निनादणारे सूर, मतदार जागृतीचा संदेश देणारे आकर्षक फलक, पहाटेची प्रसन्न वेळ अशा उत्साहवर्धक वातावरणात 'वॉक फॉर डेमोक्रसी' उपक्रमात शहरातील विविध ठिकाणाहून क्रीडांगणात आलेले नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले.
वसंत देसाई क्रीडांगण येथे वॉक फॉर डेमोक्रेसीअंतर्गत जिल्हाधिकारी अजित कुंभार,. जि . प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी उपस्थित क्रीडापटूंना मतदानाचे महत्त्व विशद करीत मागील विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्याची मतदान टक्केवारी लक्षात घेता प्रत्येकाने पुढे येत १०० टक्के मतदानाचा हक्क बजावत जिल्ह्याचा एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.
यावेळी नागरिकांनी सेल्फी पॉईंटला सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट,स्वीप ब्रँड ॲम्बेसेडर पलक झामरे, स्विप अभियायानातील सदस्य आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक पल्लवी डोंगरे व आरजे दिव्या यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा