स्थिर व फिरत्या पथकांच्या प्रमुखांना दंडाधिका-यांचे अधिकार

 

स्थिर व फिरत्या पथकांच्या प्रमुखांना 

विशेष कार्य दंडाधिका-यांचे अधिकार

 

अकोला, दि. 29 : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिका-यांनी नियुक्त केलेल्या स्थिर देखरेख पथक व फिरत्या पथकांच्या प्रमुखांना निवडणूक काळात दि. 25 नोव्हेंबरपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत.

 

त्याचप्रमाणे, जिल्हा निवडणूक अधिका-यांनी नियुक्त केलेल्या स्थायी क्षेत्रीय अधिका-यांनाही (झोनल ऑफिसर) दि. 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार असतील.

विशेष कार्यकारी दंडाधिका-यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 148,152,162 व 163 नुसार निवडणूक सुरळीत पार पाडण्याबाबत आवश्यक कार्यवाहीसाठी अधिकार आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले