प्रथम हप्त्याचे प्रदान ऑगष्ट महिन्याच्या निवृत्ती वेतनासोबत


अकोला,दि.31 (जिमाका)- अकोला  कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या  व दिनांक 1 जानेवारी 2016 पुर्वी  सेवानिवृत्त  झालेल्या  सर्व राज्य  शासकीय  निवृत्तीवेतन धारक/कुटूंब निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, माहे जुन 2019 च्या निवृत्तीवेतनासोबत  काही  निवृत्ती वेतन धारकांना 7 वेतन आयोगाच्या  फरकाच्या रकमेपैकी प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आलेले आहे.  उर्वरीत  निवृत्तीवेतन धारकांना  जुलै 2019  च्या  निवृत्तीवेतनासोबत  करण्यात  येणार होते परंतु  काही तांत्रिक  अडचणीमुळे जुलै 2019  च्या  निवृत्तीवेतनासोबत प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात येणार नसुन  ते माहे ऑगष्ट 2019 च्या  निवृत्तीवेतनासोबत करण्यात येणार आहे तरी  संबंधीत निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी यांची नोंद घ्यावी असे कोषागार अधिकारी मा.ब. झुंजारे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ