पिक कर्ज वाटपाला प्राधान्य द्या-किशोर तिवारी यांचे निर्देश


अकोला,दि.31 (जिमाका)-  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी पिक कर्ज  वाटपाला  बॅकांनी  प्राधान्य द्या, असे निर्देश  कै. वसंतराव  नाईक शेती  स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  नियोजन भवनात मंगळवारी (दि.30 रोजी) सायंकाळी आयोजीत आढावा  बैठकीत ते  बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक  आलोक ताराणीया, उपनिबंधक सहकारी संस्था  डॉ. प्रविण लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात पिक कर्ज वाटपाचे  1398 कोटी 78 लाख रूपयाचे उद्दिष्ट आहे. तरी सर्व बॅंकांनी 15 ऑगष्ट पर्यंत उद्दिष्ट  पुर्ण करावे ,अशा सुचना यावेळी किशोर तिवारी यांनी दिल्या.
जिल्ह्यात उपनिबंधक सहकारी संस्था  व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक  यांच्या सहकार्याने  बॅंकांनी मंडळ निहाय पिक कर्ज वाटप तसेच  कर्ज पुर्नगठणसंबंधी मेळावे आयोजित केल्यामुळे पिक कर्ज वाटपाला गती ली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी यावेळी दिली. या आढावा बैठकीला  जिल्हा  बॅंकेचे अधिकारी तसेच  राष्ट्रीयकृत बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ