मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवा- विभागीय आयुक्त पियुष सिंह


अकोला, दि.३१(जिमाका)- आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रियेसंदर्भात अधिकाधिक जनजागृती करावी व नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढवावा, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज येथे संबंधित यंत्रणांना दिले.
मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्‍त पुर्नरिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. त्‍याअनूषंगाने दि.15 ते 30 जूलै या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करून अकोला जिल्ह्यातील नागरीकांकडून मतदार नोंदणी, वगळणी, स्थलांतर आदीं करीता नमुना 6,7,8, आणि 8 अ भरुन घेण्‍यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ६१५८ जणांचे अर्ज निवडणूक यंत्रणेकडे दाखल झाले आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयूक्‍त अमरावती विभाग यांनी सदर मोहिमेचे अनूषंगाने मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांसोबत आढावा सभा आज सकाळी जिल्‍हाधिकारी अकोला यांच्या दालनात आयोजित केली होती.
या सभेस विभागीय आयुक्‍त,अमरावती विभाग पियुष सिंह यांचेसह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 28 अकोट रामदास सिध्‍दभट्टी,29 बाळापुर रमेश पवार, 30 अकोला पश्चिम गजानन सुरंजे, 31 अकोला पुर्व निलेश अपार, तसेच मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षाचे माधव मानकर, विजय येलकर हे उपस्थित होते. सदर सभेमध्‍ये खालील विषयाबाबत सविस्‍तर आढावा घेण्‍यात आला. सर्व मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांना बि.एल.ए यांची मतदान केंद्रनिहाय नियुक्‍ती करण्‍याबाबत सुचना केल्‍या.तसेच सर्व मान्‍यता पक्ष यांनी बि.एल.ए यांची नियुक्‍ती करून मृत,स्‍थलांतरीत तसेच बाहेरगावी राहणारे व नविन नोंदणी बाबत बि.एल.ओ यांना सहकार्य करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. यावेळी ते म्हणाले की, सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपले क्षेत्रातील मतदान केंद्र सुस्थितीत आहेत याबाबत पून्‍हा खात्री करावी. तसेच मतदान केंद्र बदलावयाचे असल्‍यास तात्‍काळ तसा प्रस्‍ताव मा.मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांना सादर करावा. सर्व निवडणुक निर्णय अधिकारी विधानसभा मतदारसंघ तथा उविअ/उपजिल्‍हाधिकारी महसूल यांनी त्‍यांचे कार्यक्षेत्रामध्‍ये ईव्‍हीएम व्हिव्हिपॅट करीता सुस्थितीत असलेले स्ट्रॉंग रूम व मतमोजणी कक्ष स्‍थापित करण्‍याबाबत निर्देश दिले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनूषंगाने आवश्‍यक मनुष्‍यबळ,संवेदनशिल मतदान केंद्र, सुरक्षा व्‍यवस्‍था, मतदान केंद्र, मतदार यादी, स्विप कार्यक्रम, साहित्‍य ई. विविध विषयाबाबत आढावा घेण्‍यात आला. स्विप कार्यक्रम अंतर्गत जास्‍तीत जास्‍त नागरीकांची मतदार नोंदणी करणे, तसेच मतदान प्रक्रियेमध्‍ये सहभाग वाढविणे याबाबतीत कार्यवाही करण्‍याकरीता निर्देश दिले. लोकसभा निवडणूक 2019 मध्‍ये जिल्ह्यात किमान मतदान झालेले मतदान केंद्र निश्चित करून शहानिशा करण्‍याबाबत निर्देश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ