जि.प.उपकर निधीःलाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध


अकोला,दि.30 (जिमाका)- जिल्हा परिषद कृषि विभाग अकोला  अंतर्गत  सन 2019-20 मध्ये अर्थसंकल्पानुसार  जिल्हा  परिषद उपकर निधीमधुन सात योजनांना मंजुरी  मिळाली होती. या योजनेतून सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर प्लास्टीक ताडपत्री, 450 GSM  पुरविणे, प्लास्टीक  ताडपत्री 370 GSM  पुरविणे, ओपनवेल सबमर्सिबल पंप 5 एच पी पुरविणे,  सबमर्सिबल पंप 5 एच पी 8 स्टेजेस  पुरविणे, डिझेल पंप 5 एच पी पुरविणे, सोयाबीन  स्पायरल सेप्रेटर/ग्रेडर पुरविणे, एचडीपीई पाईप पुरविणे आदी बाबी अंतर्भूत आहेत. या योजनेअंतर्गत  15 जुलै अखेर पर्यंत   4907 अर्ज तालुकानिहाय  प्राप्त  झाले हेाते. त्यापैकी 4273 अर्ज निकषानुसार पात्र ठरले असुन  634 अर्ज अपात्र आहेत. या पात्र/अपात्र ठरलेल्या  लाभार्थ्यांची यादी जिल्हा  परिषद , अकोला यांचे  www.z.p. akola.nic.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित तालुक्यातील पं.स मुख्यालयी  व जि.प. कृषि विभाग  मुख्यालयी नोटीस बोर्डावर अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हा परिषद अकोला प्रशासनातर्फे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ