महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना : सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची निवड


अकोला,दि.31 (जिमाका)-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजनेतंर्गत ता. पातुर जि. अकोला मध्ये सामाजिक अंकेक्षण  करण्याकरिता निवड करावयाची साधन व्यक्तीची संख्या –ग्राम  साधन  व्यक्ती- 60, समुह सधन व्यक्ती- 05  व तालुका सधन व्यक्ती- 01 या प्रमाणे  गाव पातळीवर  केलेल्या कामाचे  सामाजिक अंकेक्षण  केले जाणार  आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये गावांचे सामाजिक  अंकेक्षण करावयाचे  आहे. त्या ग्रामपंचायतीची  यादी ग्रामपंचायत/तहसिल/ पंचायत समिती तेथे  पहावयास मिळणार आहे.
 अर्जाचे नमुने  ता पातुर येथे किंवा  पं.स. पातुर येथे उपलब्ध होतील, ग्राम साधन व्यक्ती किमान 10 वी पास उपलब्ध न झाल्यास 8 वी पास, समुह साधन व्यक्ती किमान  12 वी पास उपलब्ध न झाल्यास  10 वी पास, तालुका सधन व्यक्ती किमान  पदविधर उपलब्ध   न झाल्यास 12 वी पास असे राहील.
ग्राम पंचायत क्षेत्रातील शैक्षणिक अहर्ताधारण केलेल्या व्यक्तीच्या निवडीकरीता ग्रामपंचायतस्तरांवर  उमेदवारांचे  अर्ज ग्रामपंचायतस्तरावर/ स्थानिक  पातळीवर  संकलित  करून  परिपुर्ण अर्ज दिनांक 14 ऑगष्ट  रोजी सायं. पाच वाजेपर्यंत मग्ररोहयो कक्ष पंचायत समिती पातुर येथे  पाठवावे,  असे गटविकास अधिकारी (गट-अ) पंचायत समिती पातूर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ