विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक


अकोला,दि.31 (जिमाका)-  अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी  आज जिल्हाधिकारी  कार्यालयात  जिल्हास्तरीय आढावा बैठकीत  विविध  विषयांचा आढावा घेतला.
नियोजन सभागृहात आज सकाळी आयोजीत बैठकीस जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष  प्रसाद, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  निवासी उपजिल्हाधिकारी  राम लठाड तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्तांनी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या  कामासंदर्भात यंत्रणानिहाय  आढावा  घेतला. आता पाऊस होते असुन जमिनीत पुरेसा ओलावाही निर्माण झाला असुन  रोप लागवडीचे  काम तात्काळ पुर्ण करावे. यामुळे रोपे जगण्याच्या प्रमाणातही वाढ होईल, अशी सुचना  यंत्रणांना  केली. यावेळी विभागीय आयुक्त  सिंह  यांनी  प्रधानमंत्री  किसान  सन्मान  निधी , स्वच्छ भारत  अभियान, आयुष्यमान भारत योजना  प्रधानमंत्री आवास योजना,ई- सेवा केंद्राच्या कामकाजाबाबत आढावा घेतला.तसेच महसुल विभागाच्या विविध  उपक्रमांचाही आढावा घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ