जिल्ह्यातील दोन ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम


अकोला,दि.30 (जिमाका)-  राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील  नव्याने स्थापित दोन ग्रामपंचायत निवडणूकांकरीता निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.  त्यात जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केलपाणी व केलपाणी बु. या दोन ग्रामपंचायतीतील थेट सरपंच तसेच प्रत्येकी तीन या प्रमाणे सहा प्रभागांमध्ये एकूण १४ सदस्यांची निवड करण्यासाठी या निवडणूका होणार आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून प्राप्त माहितीनुसार, या निवडणूक कार्यक्रमात दि.१ ऑगस्ट रोजी तहसिलदार हे निवडणूक अधिसुचना प्रसिद्ध करतील. दि.९ ते १६ऑगस्ट दरम्यान ( सुटीचे दिवस वगळून) नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात स्विकारले जातील.  नामनिर्देशन पत्रांची छाननी  १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. नामनिर्देशन पत्र माघारीसाठी दि.२१ रोजी दुपारी ३ वा. पर्यंत मुदत असेल.  आवश्यकता भासल्यास दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळात मतदान होईल. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणूक उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे ही  संगणकीकृत पद्धतीने भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ