उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी पुरस्कार


अकोला,दि.30 (जिमाका)-  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ठ  कार्य करणाऱ्या  माजी  सैनिक /पत्नी/पाल्य तसेच  शैक्षणिक वर्ष 2018-2019  मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  विभागीय  शिक्षण  मंडळातून  इयत्ता  10 वी, 12 वी बोर्डात  90 % पेक्षा अधिक गुण  मिळविणाऱ्या  माजी सैनिकांच्या पाल्यांना   विशेष गौरव  पुरस्काराकरीता निवड करण्यासाठी  अर्ज  मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची  शेवटची  तारीख  15 सप्टेंबर पर्यंत   आहे. तरी अकोला  जिल्ह्यातील सर्व  माजी  सैनिक/विधवा  पत्नी   यांनी  नोंद घ्यावी असे जिल्हा  सैनिक  कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध  क्षेत्रात  उत्कृष्ठ कार्य करणारे, माजी सैनिक /पत्नी पाल्य यांना  शैक्षणिक वर्ष  2018-2019 मध्ये खेळातील  पुरस्कार प्राप्त  खेळाडू , साहित्य , संगित , गायन, वादन , नृत्य  इत्यादी  क्षेत्रातील पुरस्कार विजते, यशस्वी  उद्योजकांचा  पुरस्कार  मिळविणारे , संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ठ कामगिरी  करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे  लक्षणीय  काम करणारे माजी सैनिक /पत्नी  /पाल्य  यांना विशेष गौरव  पुरस्कारा करीता  निवड करण्याकरीता  अर्ज  मागविण्यात  येत असुन  फॉर्म भरण्याची  शेवटची  तारीख 15 सप्टेंबर आहे. विशेष गौरव  पुरस्काराचे फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी  अकोला  जिल्ह्यातील  सर्व माजी सैनिक  /विधवा पत्नी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा  सैनिक कल्याण अधिकारी आर.. लठाड  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ