वाशिम येथे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची गुरुवारी (दि.1ऑगस्ट) सुनावणी


अकोला,दि.29(जिमाका)- बालकांच्या अधिकारांच्या उल्लंघनाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची सुनावणी वाशिम येथे होणार आहे. या सुनावणीत अकोला जिल्ह्यातील बाल हक्क उल्लंघनाच्या तक्रारीही संबंधितांना दाखल करता येणार आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे  यांनी केले आहे.
राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या खंडपिठाद्वारे आयोजित या सुनावणीत बालहक्क उल्लंघनाची  तक्रार पालक, बालक, आई वडील, काळजीवाहक वा अन्य कोणीही व्यक्ती दाखल करु शकते. यात प्रामुख्याने बालकामगार, त्रासात असलेली बालके,  बाल न्याय किंवा दुर्लक्षित , दिव्यांग, विशेष बालके यांची काळजी, भिक्षावृत्ती, बालकांचे गैरवर्तन,  बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बालकांची खरेदी विक्री, बालकांचे मृत्यू,  अपहरण, माध्यमांद्वारे होणारे उल्लंघन, बालकांचे लैंगिक शोषण, बालकांचे आरोग्य या प्रकारच्या तक्रारी आयोगासमोर दाखल करता येऊ शकतील. सदर सुनावणी दि.1 ऑगस्ट रोजी  सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम  येथे होणार आहे. सुनावणीसाठी सकाळी 9 वाजेपासून नोंदणीस प्रारंभ होणार आहे. तरी  अकोला जिल्ह्यातील तक्रारी सादर करण्यासाठी  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे  बुधवार दि.31 जुलै पर्यंत दाखल करता येतील, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी योगेश जवादे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ