जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
अकोला,दि.१ : कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, अधीक्षक श्याम धनमने, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा