कृषी यांत्रिकीकरण योजनेत बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी अर्ज करावा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
कृषी यांत्रिकीकरण योजनेत बी.बी.एफ. पेरणी यंत्रासाठी अर्ज करावा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन अकोला, दि. ६ : अल-निनो च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ मध्ये सोयाबीन, तूर, मुंग व उडीद पिकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी, बियाण्याची बचत व उत्पादन वाढ करण्याच्या हेतूने बी.बी.एफ. पेरणी यंत्र यांचा कृषी यांत्रिकीकरण अभियानातंर्गत समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट हे याबाबिच्या अनुदानासाठी पात्र राहतील. बी.बी.एफ.पेरणी यंत्र (ट्रॅक्टर ३५ बी.एच.पी. वरील) खरेदीसाठी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती /महिला/अल्प/अत्यल्प शेतकरी यांना ५५ हजार रुपये प्रति यंत्र किंवा किमतीच्या ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते व सर्वसाधारण/मोठे शेतकरी यांना ४४ हजार रुपये प्रति यंत्र किंवा किमतीच्या ४० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. याबाबीची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपभियान (SMAM) मार्गदर्शक सूचनांनुसार करावी. यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी (https://mahadbtmahait.gov.in) या वेबसाईटवर जाऊन ...