पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ओळखपत्रांचा पर्याय

  मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ओळखपत्रांचा पर्याय अकोला, दि. 30 ; विधानसभा    सार्वत्रिक   निवडणूकीसाठी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदान ओळख पत्र नसल्यास  अन्य पर्यायांचा वापर करता येणार आहे. जे मतदार आपले   मतदान ओळख पत्र दाखवू शकणार नाहीत त्यांच्यासाठी पर्यायी पुरावे म्हणून   पुढील कागदपत्रांचा ओळखीचा पुरावा म्हणून वापर करता येईल. त्याला   निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यापैकी कोणतेही एक कागदपत्र मतदार आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करु शकतील , असे   जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी कळविले आहे. आधार कार्ड ,   मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड) ,   बँक / टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक ,   श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ,   वाहन चालन परवाना ,   स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड) ,   राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक ( आरजीआय)   यांनी दिलेले स्मार्ट कार्ड ,   भारतीय पारपत्र (पासपोर्ट) ,   छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे ,   केंद्र सरकार/राज्य शासन/सार्वजन

सामान्य निरीक्षक गिरीशा पी. एस. हे अकोल्यात दाखल

इमेज
  सामान्य निरीक्षक गिरीशा पी. एस. हे अकोल्यात दाखल अकोला, दि. 30 : विधानसभा निवडणूकीसाठी अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक गिरीशा पी. एस. हे अकोल्यात दाखल झाले आहेत. त्यांचे वास्तव्य शासकीय विश्रामगृहातील गुलमोहर कक्षात असेल. मतदारांना त्यांना भेटावयाचे झाल्यास त्यांच्या भेटीची वेळ दु. 4.30 ते 5.30 आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8668494441 व दूरध्वनी क्रमांक (0724) 2992161 आहे. ०००

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

  मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद अकोला, दि. 30 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी होणार असून, या बुधवारी भरणारे अकोला जिल्ह्यातील आठवडी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी पारित केले आहेत. ०००

'वॉक फॉर डेमॉक्रसी'च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद शासकीय उद्यान व वसंत देसाई क्रीडांगणात मतदार जागृती अभियान

इमेज
'वॉक फॉर डेमॉक्रसी'च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद   शासकीय उद्यान व वसंत देसाई क्रीडांगणात मतदार जागृती अभियान         अकोला, दि,३०:  'स्वीप'अंतर्गत शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान येथे, तसेच इतर उद्यानांत 'मॉर्निंग वॉक'साठी आलेल्या नागरिकांशी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 'वॉक फॉर डेमॉक्रसी' च्या माध्यमातून संवाद साधला व दि.२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असा संदेश दिला.   नोडल अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी महेश परांडेकर,मनपा उपायुक्त गीता ठाकरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार आदी उपस्थित होते.   विविध देशभक्तीपर गीतांचे आसमंतात निनादणारे सूर, मतदार जागृतीचा संदेश देणारे आकर्षक फलक, पहाटेची प्रसन्न वेळ अशा उत्साहवर्धक वातावरणात 'वॉक फॉर डेमोक्रसी' उपक्रमात शहरातील विविध ठिकाणाहून क्रीडांगणात आलेले नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले.    वसंत देसाई क्रीडांगण येथे

सोयाबीनमधील आर्द्रता तपासण्याबाबत आवाहन

  सोयाबीनमधील आर्द्रता तपासण्याबाबत आवाहन अकोला, दि. 29 : शेतक-यांनी सोयाबीन पिकातील आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याची शहानिशा करावी, असे आवाहन पणन महासंघाचे जिल्हा विपणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.   आधारभूत किंमत खरेदी योजनेत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली. सोयाबीनमधील आर्द्रता तपासणे आवश्यक आहे. 12 टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेचा व एफएक्यू दर्जाचा सोयाबीन आणण्याचे आवाहन श्री. काकडे यांनी केले. ०००

प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठ्याचे रब्बीसाठी नियोजन करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठ्याचे रब्बीसाठी नियोजन करा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 29 : बिगरसिंचन मागणी वजा करून उर्वरित शिल्लक राहणा-या पाणीसाठ्याचे रब्बी हंगामासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या सभेत ते बोलत होते. पाटबंधारे विभाग, जि. प., पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र, महापालिका, पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण, मूर्तिजापूर, तेल्हारा, शेगाव, पातूर येथील नगरपरिषदा आदींचे अधिकारी उपस्थित होते. पाणी आरक्षणाच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम संबंधित यंत्रणेने जलसंपदा विभागाकडे भरणे बंधनकारक आहे. थकबाकीदार योजनांनी ती तत्काळ भरावी. काटेपूर्णा प्रकल्पाची 64 खेडी पाणीपुरवठा योजना व वान प्रकल्पाची 84 खेडी अकोट पाणीपुरवठा योजना जादा पाणी आरक्षित करत आहेत, तसेच महान मत्स्यबीज केंद्र व पातूर योजना दरवर्षी आकस्मिक पाणी आरक्षित करत असल्याचा जलसंपदा विभागाचा अहवाल आहे. या योजनांनी वाढीव बिगर सिंचन पाण्याची गरज लक्षात घेऊन रीतसर पाणीआरक्षण करून घ्यावे व ज्या ग्राहकांनी पाणी मीटर

स्थिर व फिरत्या पथकांच्या प्रमुखांना दंडाधिका-यांचे अधिकार

  स्थिर व फिरत्या पथकांच्या प्रमुखांना  विशेष कार्य दंडाधिका-यांचे अधिकार   अकोला, दि.   29 : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिका-यांनी नियुक्त केलेल्या स्थिर देखरेख पथक व फिरत्या पथकांच्या प्रमुखांना निवडणूक काळात दि. 25 नोव्हेंबरपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत.   त्याचप्रमाणे, जिल्हा निवडणूक अधिका-यांनी नियुक्त केलेल्या स्थायी क्षेत्रीय अधिका-यांनाही (झोनल ऑफिसर) दि. 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार असतील. विशेष कार्यकारी दंडाधिका-यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 148,152,162 व 163 नुसार निवडणूक सुरळीत पार पाडण्याबाबत आवश्यक कार्यवाहीसाठी अधिकार आहेत. ०००

निवडणूकविषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक जाहिरात प्रसारणाच्या तीन दिवसापूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक

  निवडणूकविषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक   जाहिरात प्रसारणाच्या तीन दिवसापूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक       अकोला, दि. 29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.निवडणूकविषयक सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरणासाठी तीन दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे.             जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी अर्ज माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.              राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे. या नियमावलीनुसार राजकीय पक्ष व उमेदवारांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खाजगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृ

हक्क बजावणार मतदानाचा ‘स्वीप’अंतर्गत मतदान जागृतीचे शिक्के वितरित

इमेज
    हक्क बजावणार मतदानाचा ‘स्वीप’अंतर्गत मतदान जागृतीचे शिक्के वितरित अकोला, दि. 28 : ‘स्वीप’अंतर्गत अभिनव संकल्पनेतून   ‘मी जागरूक नागरिक भारताचा, हक्क बजावणार मतदानाचा’   अशा ओळींचा ठसा उमटविणारे रबरी शिक्के व्यापारी व दुकानदारांना आज वितरित करण्यात आले.   जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार व ‘स्वीप’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनानुसार ‘स्वीप’अंतर्गत अभिनव संकल्पनांतून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील पालिका बाजार, कापड बाजार, गांधी रस्ता, फतेह अली रस्त्यावरील विविध दुकाने आदी ठिकाणी स्वीप स्वयंसेवकांनी जाऊन दुकानांमध्ये रबरी शिक्क्यांचे वितरण केले. दुकानांच्या पावत्या, देयके आदींद्वारे हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. सर्व ग्राहकांपर्यंत संदेश पोहोचविण्याची ग्वाही सर्व व्याववसायिकांनी दिली.   यावेळी विविध स्टीकर्सही बाजारपेठांत लावण्यात आले आहेत. सीईओ बी. वैष्णवी यांच्यासह महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, उपायुक्त गीता ठाकरे आदी उपस्थित होते.   सर्व मतदारांनी येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी

मतदानापूर्वीच्या आठवड्यात ‘एक्झिट पोल’वर बंदी

 मतदानापूर्वीच्या आठवड्यात ‘एक्झिट पोल’वर बंदी  अकोला, दि. 25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वीचे आठ दिवस दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून ते दि. 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा. पर्यंत निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.  ०००

निवडणुकीदरम्यान जप्तीसंदर्भात त्रिसदस्यीय समिती निर्णय देणार

  निवडणुकीदरम्यान जप्तीसंदर्भात त्रिसदस्यीय समिती निर्णय देणार अकोला,दि. 25 : निवडणुकीदरम्यान रोख रक्कम जप्तीसंदर्भात  त्रिसदस्यीय समितीकडून सविस्तर तपास करून निर्णय घेतला जाणार आहे. जप्त रक्कम मुक्त करण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम’ निश्चित करण्यात आली आहे.  जनतेची व ख-या व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी जप्त रक्कम मुक्त करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी तीन अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, निवडणूक खर्च संनियंत्रण अधिकारी व जिल्हा कोषागार अधिकारी एम. बी. झुंजारे यांचा या समितीत समावेश आहे. निवडणुकीदरम्यान पोलीस, एसएसटी, एफएसटी यांनी केलेल्या जप्तीच्या प्रकरणाची समिती स्वत: तपासणी करेल व सदर जप्तीविरोधात एफआयआर दाखल नसेल किंवा ही रक्कम निवडणूक प्रचार, उमेदवार, पक्ष आदीशी संबंधित नसेल तर ही रक्कम परत देण्यासाठी पावले उचलली जातील. जर रक्कम 10 लाखांच्या वर असेल तर प्राप्तीकर विभागाला कळविण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक खर्च संनियंत्रण अधिकारी श्री. धोंगडे (मो. 8805049933) यांनी दिली.                        ०००

आयोगाकडून वेळ निर्धारित; मतमोजणी सकाळी 8 पासून सुरू होणार

  आयोगाकडून वेळ निर्धारित; मतमोजणी सकाळी 8 पासून सुरू होणार अकोला, दि. 24 :   विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 पासून सुरू होईल. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी सुरू करण्याची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. 28- अकोट मतदारसंघाचे मतमोजणी ठिकाण गोदाम क्रमांक 5 , कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती , पोपटखेड रोड , अको ट, त्याचप्रमाणे, 29 -बाळापुर मतदारसंघाचे मतमोजणी स्थळ शासकीय धान्‍य गोदाम क्र.1 , खामगाव रोड , बाळापूर येथे आहे. 30 -अकोला (पश्चिम) आणि 31-अकोला (पूर्व) मतदारसंघाची मतमोजणी अनुक्रमे शासकीय धान्‍य गो दाम क्र.1 कक्ष क्र.3 आणि शासकीय धान्य गोदाम क्र.2 कक्ष क्रमांक 2 येथे होईल. 32 -मुर्तिजापूर ( अ.जा. ) मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम क्र. 5 , तहसिल कार्यालय परिसर , मुर्तिजापूर येथे होईल. ०००  

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

इमेज
     विधानसभा निवडणूक                 2024   पूर्वपिठीका       अकोला जिल्हा                निवडणूक कार्यक्रम जिल्ह्यातील मतदारसंघ (एकूण पाच) 28-अकोट 29-बाळापूर 30-अकोला (पश्चिम) 31-अकोला (पूर्व) 32-मुर्तिजापूर (अ.जा.) 000 कार्यक्रमाचे टप्‍पे दिनांक निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द करणे व  नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक दिनांक 22 /10/2024 (मंगळवार) नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक दिनांक 29 /10/2024 (मंगळवार) ना‍मनिर्देशनपत्र  छाननी करण्‍याचा दिनांक दिनांक 30 /10/2024 (बुधवार) उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक दिनांक 04 /11/2024 (सोमवार) मतदानाचा दिनांक दिनांक 20 /11/2024 (बुधवार) मतमोजणीचा दिनांक दिनांक 23 /11/2024 (शनिवार) निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्‍याचा दिनांक दिनांक 25 /11/2024 (सोमवार)         दि. 14 ऑक्‍टोबर 2024 अखेर मत