पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

    ‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार   वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश अकोला, दि. ३ : वृक्षक्रांती मिशनतर्फे ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवडीचा प्रस्ताव असून, त्यांना सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्यातर्फे ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील ६० शासकीय कार्यालये व जागांमध्ये या उपक्रमात वृक्षलागवड झाली. यंदाही हा उपक्रम राबविण्याची इच्छा असून, जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, ई-क्लास जमीनीवर, तसेच एमआयडीसीच्या खुल्या जागांवर स्वस्तिक वृक्षलागवडीसाठी नि:स्वार्थ सेवा देण्याची तयारी आहे, असे श्री. नाथन यांनी प्रस्तावात नमूद केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील वृक्षलागवडीला चालना मिळण्यासाठी कार्यालयातील जागा, पाण्याची व्यवस्था, रोपे, कुंपण, यंत्रसामग्री आदी बाबींसाठी यंत्रणांनी मिशनला सहक...

विशेष लेख मनुष्यबळाच्या कौशल्यवृद्धीसाठी ‘महा-साधना सप्ताह’

विशेष लेख  मनुष्यबळाच्या कौशल्यवृद्धीसाठी ‘महा-साधना सप्ताह’ भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत 8 लाख 80 हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये राज्यातील 36 जिल्हे, 32 विभाग, आणि 6 विभागीय कार्यालये यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी म...

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’

    अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी   2   ते   8   एप्रिलदरम्यान   ‘ महा-साधना सप्ताह ’   अकोला, दि. १ : भारत सरकार ,   क्षमता विकास आयोग ( CBC)   आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने   2   एप्रिल ते   8   एप्रिल   2026   या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे ,   भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.   केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह   2   ते   8   एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत   8   लाख   80   हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी   7   दिवसांत किमान   4   तासांचे अभ्यासक्रम   आय गॉट   कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण क...